स्वस्तात पाडला पाऊस
कुणाचा अडला काय सवाल?
समान रेषेत तिरक्या चालीचा
मीही धरलाच होता ताल,
पावसात कुणी बेफ़िकिर नागडा
सहसा चालत नाही कुणाला
नग्न दुधारी कंपायमानशी
तीही फ़क्त अस्पष्ट आडोशाला
रती भिजवीली,मती भिजवीली
जळणायांचे अखेर सोने होते,
रांगेमध्ये पुढे उभे ते
बहुदा सगळेच त्याअर्थी मोने होते
असेच नसेलही काही, त्यांना
माझी सवयच नव्हती बहुदा,
पण ते गेले त्याआधीच कधीकाळी
त्यांनी पैदा केला होता त्यांचा खुदा
हा खुदाच आता खिजवत असतो
येणाया पावसांना, तिरक्या अथवा सरळ
भुईवर आपटून लुप्त होत रहावे आणि,
पाठी ठेवीत अपराधी मरगळ.
-नितीश.
(१-८-२००९).
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment